विद्यापीठ कर्मचाऱ्यांची विविध मागण्यांसाठी निदर्शने

0

उद्या काळ्या फिती लावून कामकाज ; १६ रोजी लाक्षणिक संपाचा इशारा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यातील अकृषीय विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासनाकडून न झाल्याने याचा निषेध म्हणून आज बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कर्मचाऱयांनी शासनाचा निषेध व्यक्त करून निदर्शने केली. तसेच उद्या निषेध म्हणून काळ्या फिती लावून कामकाज करण्यात येणार असून १६ रोजी लाक्षणिक संप करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. याप्रसंगी दुर्योधन साळुंखे, हिंमतराव पाटील,,मुरलीधर सपकाळे,जयंत सोनावणे, अरुण सपकाळे आदी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात करण्यात आले.

पत्रकात म्हटले आहे कि, महाराष्ट्रातील अकृषि विद्यापीठीय व संलग्नीत महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांना राज्यातील इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सन १९९४ पासून १२ वर्षाच्या सलग सेवेनंतर पदोन्नतीतील कुंठीतता घालवण्यासाठी शासनाने प्रथम लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू केलेली आहे. सहाव्या वेतन आयोगामध्ये सदर योजनेचे नाव सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना म्हणून लागू झाली असून, सेवेत कार्यरत कर्मचारी त्याचा लाभ घेत आहेत. तसेच सातव्या वेतन आयोगासाठी गठित झालेल्या के पी.बक्षी समितीने सदरची योजना तीन लाभाची म्हणजेच पुर्ण सेवा काळात १०, २० व ३० वर्षे अशी केलेली आहे. के.पौ.बक्षी समितीचा अहवाल मंत्रीमंडळाने मंजूर देखील केलेला आहे. त्यानुसार राज्यातील इतर शासकौय कर्मचारी यांना लाभ दिला जात आहे. मात्र अकृषि विद्यापीठीय व संलग्नीत महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यांना त्याचा लाभ दिला जात नाही. तसेच सातवा वेतन आयोगासाठी गठित झालेल्या श्री.के.पी.बक्षी समितीने सहाव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी आधारभूत मानून सातवा वेतन आयोग लागू करण्याची शिफारस केलेली असतांना अद्याप राज्यातील अकृषि विद्यापीठातील एकुण १४१० कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू झालेला नाही. तसेच सातवा वेतन आयोग दि.१/१/२०१६ पासून लागू झालेला असून, त्यानुसार राज्यातील कर्मचारी, अकृषि विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षक कर्मचारी यांना ५८ महिन्यांच्या फरकांसह सदरचा सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे. तथापि फक्त शिक्षकेतर कर्मचारी यांना ५८ महिन्यांच्या फरकापासून वंचित ठेवले जात आहे, यासह इतर मागण्यांसाठी अकृषि विद्यापीठातील घटक संघटना, महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कर्मचारी महासंघ, विद्यापीठ मागासवर्गीय महासंघ, अधिकारी फोरम, राज्यस्तरीय महाविद्यालयीन महासंघ, विद्यापीठीय कर्मचारी महासंघ व महाविद्यालयीन कर्मचारी महासंघाचे सेवक कृती समिती यांनी उच्च ब तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री , संबंधित विभागाचे अधिकारी यांची वेळोवेळी प्रत्यक्ष भेटी, त्यांच्यासोबत बैठका घेवून, पत्रव्यवहार करुन आजपर्यंत फक्‍त आश्वासनाशिवाय कर्मचाऱ्यांच्या पदरी काहीही पडलेले नाही. त्यासाठी सेवक कृती समितीच्या दि.०६/०१/२०२३ रोजी झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावर सुरु असलेल्या सर्व परीक्षांच्या कामावर दि.२/२/२०२३ पासून बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. शासनाच्या महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांविषयी असलेली उदासिन भावना लक्षात घेता कर्मचाऱ्यांमध्ये मोठया प्रमाणात असंतोष वाढत आहे. सदर आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणजे आज दि.१४/०२/२०२३ रोजी दुपारी १.३० ते २.०० वाजेच्या दरम्यान सर्व कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळ घोषणाबाजी करुन शासनाचा निषेध केला आहे. तसेच दि.१५ फेब्रुवारी, २०२३ रोजी सर्व कर्मचारी काळया फिती लावून कामे करतील व दि.१६ फेब्रुवारी, २०२३ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार असल्याचे म्हटले आहे.

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.