लैंगिक आजार आणि आहाराविषयी जागरुक राहणे गरजेचे – डॉ. राजश्री नेमाडे

0

 

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर च्या IQAC विभाग द्वारा नुकतेच लैंगीक स्वास्थ आणि आहार जनजागृती या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. उदय जगताप  यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कृत्रिम ऐवजी नैसर्गिक अन्न घटकांचा समावेश दैनंदीन आहारात करावा, तसेच युवकांनी व्यसनांकडे न वळता स्वताला व्यायामाचे व्यसन लावून घ्यावे, त्याने सारखे सारखे होणारे आजार टळतील. आणि पर्यायाने आर्थिक आणि मानसिक आधार मिळेल. त्यामुळे स्वतः च्या शरीराचे संवर्धन करा असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.

प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. राजश्री नेमाडे यांनी स्त्री आणि पुरुष यांच्यामधील संप्रेरके आणि त्यांचा शरीरावर होणारा परीणाम तसेच त्यांच्यातील विविध लैंगीक आजारांविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तसेच प्रा.डॉ. कल्पना पाटील, प्रा.डॉ. जयश्री पाटील, प्रा.डॉ. सीमा बारी, प्रा.डॉ. पल्लवी भंगाळे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.डॉ. टी.एम.सावसाकडे यांनी केले तर सूत्रसंचलन  प्रा.शुभांगी पाटील यांनी व आभार प्रा. डॉ.सविता वाघमारे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.