महावीर जन्मकल्यानक महोत्सव अध्यक्षपदी भरत कोठारी…

0

 

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शहरात महावीर जन्मकल्यानक महोत्सव यंदा मोठ्या थाटात साजरा होणार असून यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी भरत घेवरचंद कोठारी यांची एकमताने निवड करण्यात आली.

दि 2,3 आणि 4 एप्रिल रोजी हा महोत्सव साजरा केला जाणार आहे. यासाठीच्या नियोजनासाठी दि 14 रोजी बैठक पार पडली यावेळी महोत्सव समिती अध्यक्षपदी भरत कोठारी यांची निवड जाहीर करण्यात आली. सदर बैठकीत सर्व समाजाचे संघपती बटुकभाई गोसलिया, घेवरचंद कोठारी, डॉ किशोर शाह, डॉ रवींद्र जैन, भीकचंद खिवसरा, संजय गोलेच्छा, सुनिल छाजेड, विपूल डागा, राजेश बेदमुथा, विजय पारख, प्रा सुभाष ओसवाल, रमेशचंद्र कोठारी, किरणचंद बेदमुथा, कैलास लोढा, भिकचंद छाजेड, ललित बाफना, वृषभ पारख, दिनेश कोठारी, पारस लूनावत, जितेंद्र कटारिया आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here