Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»जिल्हा परिषद शाळांचे रूप पालटणार !
    ताज्या बातम्या

    जिल्हा परिषद शाळांचे रूप पालटणार !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 17, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील १८२१ जिल्हा परिषद शाळांच्या बळकटीकरणासाठी ४ कोटी ५३ लाखांचा निधी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मंजूर केला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचे रूपडं पालटणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली‌.

    जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ मधून विशेष दुरुस्ती योजनेअंतर्गत स्वच्छतागृह, शौचालय, वर्ग खोल्यांची दुरुस्ती, वर्गातील इलेक्ट्रिक फिटिंग या कामांसाठी ४ कोटी ५३ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या वर्ग खोल्यांमध्ये पुरेसा प्रकाश असेल तर विद्यार्थ्यांना कोणतेही नेत्र विकार होणार नाहीत, वर्गात पुरेशी हवा खेळती रहावी म्हणून जिल्ह्यातील सर्व १८२१ जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ६६९१ वर्ग खोल्यांमध्ये प्रत्येक वर्ग खोलीत दोन एलईडी ट्यूब व एक पंखा बसवण्यासाठी १ कोटी ८५ लक्ष रुपयाची तरतूद तसेच वर्ग खोल्यांची दुरुस्ती, स्वच्छतागृह, शौचालय यांची दुरुस्ती, रॅम्पची दुरुस्ती, वर्ग खोल्यांमध्ये इलेक्ट्रिक फिटिंग या कामासाठी २ कोटी ७९ लाख असा एकूण ४ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व मदत, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

    निपुण भारत कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्ता विकासासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद अनेक उपक्रमांची अंमलबजावणी करीत आहे, त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ५०० पेक्षा जास्त जिल्हा परिषद शाळांसाठी संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे.आता मंजूर झालेली सर्व कामे देखील अतिशय गुणवत्तापूर्ण, दर्जेदार व तात्काळ पूर्ण करावीत अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.

    नुकतीच जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, यांची मॅरेथॉन बैठक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. सदर सभेत प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी सविस्तर आढावा सादर केला. प्राथमिक शिक्षणाचा आणि जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सलग चार तास तालुका निहाय आढावा घेतला. महिन्याच्या दुसऱ्या/तिसऱ्या गुरुवारी यापुढे देखील असाच आढावा घेण्यात येणार आहे.

    या आढाव्यात गटशिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांनी केलेल्या शाळा भेटी व त्यात गुणवत्तेसाठी केलेले कामकाज याचा नियमित आढावा घेतला जाईल. अशी माहिती शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील यांनी दिली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Guardian Minister Gulabrao Patil jalgaon Potitical
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif