बापरे…. सलमानच्या भावजींच्या गाडीचा भीषण अपघात !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या बहिणीचा नवरा आयुष शर्माच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. आयुषच्या गाडीचा मुंबईत अपघात झाला. पण चांगली गोष्ट म्हणजे, अपघाताच्या वेळी आयुष कारमध्ये उपस्थित नव्हता. त्यामुळे मोठी दुर्घटना टाळली.

आयुष शर्मा सुदैवाने बचावला
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातावेळी कारमध्ये फक्त आयुष शर्माचा ड्रायव्हर उपस्थित होता. तो कार घेऊन मुंबईतील गॅस स्टेशनकडे जात असताना दुचाकी चालकाने आयुषच्या कारला धडक दिली. धडक देणारा दुचाकीस्वार मद्यधुंद अवस्थेत होता, असं समजतंय. अद्याप या अपघाताची कोणी जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. या कर अपघाताबद्दल आयुष शर्मा किंवा सलमान खांकडून कोणतेही वक्तव्य आलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.