धक्कादायक; प्रियकराला विवस्त्र करत प्रियसीने केली हत्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर शहरात धक्कादायक घटना घडलीये. ४ वर्षे ‘लिव्ह इन’ मध्ये राहणाऱ्या महिलेने प्रियकराची हत्या केली. आपल्या मुलाच्या मदतीने प्रियकराला विवस्त्र करत मारहाण केली. त्यानंतर त्याला टेकडीवर फेकून दिले.

पोलिसांच्या माहितीनुसार, हत्या झालेल्या प्रिंयकराचं नाव आनंद साहेबराव वाघूळ (२७. रा.कबीरनगर, उस्मानपुरा) आहे. आनंद हा रिक्षाचालक होता. त्यांचं एका ४५ वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबंध होते. हे दोघेही चार वर्षांपासून ‘लिव्ह इन’ मध्ये राहत होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरु झाला होता. त्यामुळे आनंद हा मुंबईला निघून गेला होता. मात्र मागील आठवड्यात तो पुन्हा शहरात आला.

शहरात आल्यावर तो महिलेला भेटण्यास गेला. त्यावेळी “माझा नाद सोड, माझा मुलगा मोठा झाला आहे, त्याला हे कळेल, वाद वाढतील”, असं या महिलेने त्याला सांगितलं. परंतु आनंद तिला सोडण्यास तयार नव्हता. त्यामुळे त्याची हत्या करण्याचा कट केला. या महिलेने तिचा मुलगा व इतर तीन आरोपींच्या मदतीने १३ डिसेंबर रोजी आनंदला विवस्त्र करत त्याला बेदम मारहाण केली.

गंभीर अवस्थेत त्याला दुचाकीवर नेऊन साई टेकडी परिसरात फेकून दिले. दरम्यान, बेदम मारहाणीमुळे आनंदाचा मृत्यू झाला. साई टेकडी परिसरात सायंकाळी फिरायला गेलेल्या काही नागरिकांना मृतदेह आढळला. त्यांनी या प्रकरणी माहिती चिकलठाणा पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर, उपनिरीक्षक योगेश खताने यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेनदासाठी घाटीतील शवागृहात पाठवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.