ऑनलाईन हॉटेल बुकिंग करणे तरुणीला पडले चांगलेच महागात

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

महाबळेश्वर येथे ऑनलाईन हॉटेल बुकिंग करणे एका उच्चशिक्षित तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. सायबर चोरटयांनी परस्पर तरुणीच्या बँक खात्यातून ३ लाख ५ हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली असून, पोलीस अधिक तपस करत आहे.

वाघोली येथील उच्चशिक्षित तरुणीला ख्रिसमसनिमित्त महाबळेश्वरला जायचं होते. त्यास्तही महाबळेश्वरमध्ये राहण्यासाठी तिला हॉटेलची गरज होती. त्यामुळे तिने ऑनलाईन माहिती घेत द कीज हॉटेलमध्ये रूम घेण्याचे ठरवले. त्यानंतर सायबर चोरटयांनी तरुणीच्या मोबाईलवर संपर्क साधत हॉटेलचे कर्मचारी बोलत असल्याचे सांगत, बँक खात्याची माहिती घेतली. तरुणीच्या खात्यातून परस्पर तीन लाख पाच हजार रुपये लंपास केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणीनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सायबर क्राईम अंतर्गत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लोणीकंद पोलीस स्थानकाचे पोलीस अधिक तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.