प्रसिद्ध उद्योगपतीवर डॉक्टर महिलेने केले बलात्काराचे आरोप

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

एका प्रसिद्ध अब्जाधीश उद्योगपतीवर डॉक्टर महिलेने बलात्काराचे आरोप केल्यामुळे उद्योगविश्वात खळबळ उडाली आहे. वांद्रे कुर्ला संकुल पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित उद्योगपतीने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण आणि अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. उद्योगपती एक शक्तिशाली व्यक्ती असल्याने आपल्या कुटुंबाला इजा होऊ शकते, असे पीडितेने तक्रारीत म्हंटले आहे.

२४ जानेवारी २०२२ रोजी वांद्रे येथील त्यांच्या कार्यालयात ३० वर्षीय डॉक्टर महिलेवर बलात्कार केला होता. यासंदर्भात बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, दबाव आणून तक्रार मागे घेण्यास भाग पडले होते. असा आरोप पीडित महिलेने केला आहे. शेवटी १३ फेब्रुवारी २०२३ रोजी उद्योगपतीविरोधात बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित उद्योगपतीविरोधात अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.