मोठी बातमी; धोनीने दाखल केला भागीदारांविरुद्ध गुन्हा… 15 कोटींच्या फसवणुकीचे प्रकरण…

0

 

रांची, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एका स्पोर्ट्स फर्ममधील त्याच्या माजी व्यावसायिक भागीदारांविरुद्ध १५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी तक्रार दाखल केली आहे.

आर्का स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेडचे ​​मिहिर दिवाकर आणि सौम्या विश्वास यांच्या विरोधात रांची कोर्टात 2017 च्या बिझनेस डील संदर्भात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिहिर दिवाकरने 2017 मध्ये क्रिकेटपटूसोबत एमएस धोनीच्या नावाने जगभरात क्रिकेट अकादमी उघडण्यासाठी करार केला होता. परंतु, त्यांनी करारात नमूद केलेल्या अटींनुसार कार्य न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.