धरणगावात डोळ्याचे पारणे फेडणारे कुस्तीचे सामने…

0

 

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

येथील चंदनगुरु क्रीडा प्रसारक मंडळातर्फे हनुमान जन्मोत्सवानिमित्त इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या खुल्या कुस्त्यांच्या दंगलीत मानाची दोन लाख एक्कावन हजार (२५१०००) रुपयाची कुस्ती पै. हर्षवर्धन सदगीर, महाराष्ट्र केसरी, पुणे. विरुद्ध पै. हमीद इराणी, इराण येथील एशिया गोल्ड मेडलिस्ट यांच्यात झाली. दुसरी मानाची कुस्ती एक्कावन हजार रुपयाची (५१०००) विजय सुरडे, महाराष्ट्र चॅम्पियन, पुणे विरुद्ध मोहम्मद हबीब, जसराम गुरु आखाडा, दिल्ली. यांच्यात झाली. त्यामध्ये विजय सुरडे यांनी हबीब पैलवानला चित केले. ही चुरशीची लढत बरोबरीत सुटली.

या स्पर्धेत स्थानिक धरणगावच्या मल्लांसह परप्रांतीय मल्लांनी आखाडा चांगलाच गाजवला. दरम्यान कुस्त्यांचा आखाडा पूजन धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, विलास महाजन, निलेश चौधरी, विजय महाजन, जितेंद्र धनगर, वाल्मीक पाटील, चंदनगुरु प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मराठे, उपाध्यक्ष दिलीप महाजन या मान्यवरांचा हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक आर. डी. महाजन यांनी केली व आभार प्रदर्शन किशोर पवार यांनी केले. पंच म्हणून मंडळाचे संचालक किशोर महाजन, कोमल शुक्ला, अनिल महाजन, रघुनाथ महाजन, हरी महाजन यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी प्रकाश मराठे, दिलिप महाजन, शिवाजी चौधरी, गुलाब महाजन, चंदन पाटील, जगदीश मराठे, ललित सूर्यवंशी, गोपाल पाटील, चंद्रकांत सोनार, अनिल महाजन, गोरख महाजन, पप्पु कंखरे, नंदू करोसिया दत्तू महाजन शाहरुख खाटिक, आदींनी परिश्रम घेतले.

या मल्लांनी गाजवला आखाडा

हर्षवर्धन सदगीर, महाराष्ट्र केसरी, पुणे. हमीद इराणी, एशिया गोल्ड मेडलिस्ट, इराण. विजय सुरडे, महाराष्ट्र चॅम्पियन, पुणे. मोहम्मद हबीब, जसराम गुरु आखाडा, दिल्ली. निलेश महाजन, महेश वाघ, सुमित महाजन, अजय महाजन, कृष्णा महाजन, आबा धनगर, समर्थ सोनार सर्व रा. धरणगाव. सामिया बानो, आशिया खान, खंडवा. ही कुस्ती दंगल यशस्वीरित्या पार पडण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.