भवरखेडा व विवरे येथे पाणीपुरवठा योजनेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ !

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

टिका करणाऱ्यांना नेहमीच कामाच्या माध्यमातून उत्तर देत असतो. जलजीवन मिशन अंतर्गत दोन्ही गावाच्या सुमारे 3 कोटीची मंजूर पाणीपुरवठा योजना मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले असून त्यासाठी ग्रामस्थांचाही सहकार्य असू द्या, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत धरणगाव, विवरे, भवरखेडा, तालुका हद्दीपर्यंतचा 12 किमीच्या रस्त्यासाठी 10 कोटी तर विवरे, जांभोरा, सारवे खुर्द, बिलखेडा या 10 किमीच्या रस्त्यासाठी 8.50 कोटी असे एकूण 18 कोटी 50 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच या रस्त्याचा कामाला सुरुवात करणार असून दर्जेदार रस्ते करणार असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे ध्येय व धोरणे टिकविण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचेही ना.गुलाबराव पाटील यांनी सांगितले. ना गुलाबराव पाटील यांनी विरोधक व टिका करणाऱ्यांवरही तूफान फटाके बाजी केली. ते भवरखेडा व विवरे येथेपाणीपुरवठा योजनेसह विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील हे होते. यावेळी झालेल्या जाहीर सभेत भवरखेडा ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला.

Leave A Reply

Your email address will not be published.