फरार आरोपीला अटक ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

८ महिन्यांपासून फरार असलेल्या‎ आणि चाेरी, घरफाेडीसह विविध‎ प्रकारचे ३६ गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगाराला‎ एमआयडीसी पाेलिसांनी‎ शनिवारी दुपारी ३ वाजता‎ उमाळा येथे अटक करून त्याला अमळनेर पाेलिसांच्या‎ ताब्यात देण्यात आले आहे.‎

भूषण उर्फ जिगर रमेश बाेंडारे‎ (वय २६, रा. उमाळा, ता.‎ जळगाव) असे या घरफोड्याचे नाव आहे . तो उमाळा येथे‎ असल्याची माहिती एमआयडीसी‎ पाेलिसांना अमळनेर‎ पाेलिसांकडून मिळाली होती . त्यानुसार पाेलिस‎ ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे‎ यांच्या सूचनेवरून पीएसआय‎ आनंदसिंग पाटील, गणेश‎ शिरसाेळे, किशाेर पाटील यांच्या‎ पथकाने त्याला जेरबंद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.