जळगावात महिलेची दीड लाखांची सोनसाखळी लांबविली

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
जेवण झाल्यानंतर आपल्या मुलासोबत घराबाहेर पडून शतपावली करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातून दुचाकीवर तोंडावर मास्क झाकून आलेल्या दोन भामट्याने सोनसाखळी हिसकावीत पोबारा केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला असून याबाबत शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रोफेसर कॉलनीत राहणाऱ्या वंदना सुभाष पवार या शुक्रवारी रात्री ९.वाजेच्या सुमारास जिल्हा उद्योग केंद्राच्या मागील रस्त्यावर शतपावली करण्यासाठी मुलासोबत घराबाहेर गेल्या असता डोक्यात टोपी आणि तोंडाला काळ्या रंगाचा मास्क लावून दोन तरूण दुचाकीवरून वंदना पवार यांच्याजवळ आले. त्यातील एकाने पवार यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकविल्यानंतर दोघा चोरट्यांनी तेथून पळ काढला त्यांच्या मुलाने चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटे महामार्गाच्या दिशेने पळून गेले. अखेर शनिवारी सायंकाळी वंदना पवार यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दीड लाख रूपये किंमतीची सोनसाखळी लांम्बविल्याची तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.