बुलढाणा जिल्ह्यात भीषण अपघातात ६ जण ठार !

0

बुलढाणा , लोकशाही न्यूज नेटवर्क

समृद्धी महामार्गावरील मेहकर-सिंदखेडराजा दरम्यान (जि. बुलढाणा) लोणार तालुक्यातील शिवणी पिसा नजीक इर्टिगा गाडीला भीषण अपघात झाला आहे. यात 6 जण जागीच ठार झाले. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. तर बहुतांश जखमी तसेच मृत हे छत्रपती संभाजीनगरमधील एन-11 मधील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे.

हा अपघात रविवारी सकाळी लोणार तालुक्यातील शिवणी पिसा ते दुसरबीड दरम्यान घडला. भरधाव वेगातील इर्टिगा गाडी ही रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरमध्ये घुसली व तीन ते चार पलट्या मारून दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर उलटली. या अपघातामध्ये चार जण घटनास्थळीच ठार झाले तर दोन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतकांची नावे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. या वाहनामध्ये जवळपास 13 जण होते, अशी माहिती आहे. यात काही लहान मुलांचाही समावेश होता.अपघातग्रस्त ईर्टीगाचा क्रमांक एम एच 20 – 8962 आहे. एन-11 द्वारकानगरचे रहिवासी असून एमएसईबीचा कर्मचारी आहे. ते त्यांच्या कुटुंबासह देवदर्शनासाठी समृद्धी महामार्गावरून जात होते.

Leave A Reply

Your email address will not be published.