रांजणगाव येथे विजेच्या धक्क्याने मूकटी येथील तरुणाचा मृत्यू

0

चाळीसगाव ;-धुळे जिल्ह्यातील मूकटी येथे राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला रांजणगाव येथे विजेचा धक्का लागल्याने त्याला उपचारासाठी अलगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि गौरव गुलाब वानखेडे वय २४ हा तरुण मूकटी येथे राहायला होता . रांजणगाव येथे त्याला विजेचा धक्का लागल्याने त्याचे काका विष्णू पितांबर पाटील यांनी जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता अकस्मात मृत्यूची नोंद चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत करण्यात आली असून तपास मनोज पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.