गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांचा ईमेल हॅक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गुन्हेगार किती भयानक असतात याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. या गुन्हेगारांचं धाडस थेट राज्याच्या गृहमंत्रालयाला हादरवण्यापर्यंत पोहोचल आहे. त्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांचा ईमेल हॅक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने ईमेल हॅक करून विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट आदेश काढला. पोलिसांच्या सायबर सेलने आरोपीच्या नांग्या ठेचा आहेत. त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी विद्याधर महाले यांच्या नावाचा गैरवापर करून ईमेल आयडी हॅक करून बनावट आदेश काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांच्या सायबर सेलने आरोपीला अटक केली आहे. आरोपीने बदलीचे बनावट आदेश काढल्याचं तपासात उघड केलं आहे. आरोपीने बनावट आदेश काढून लोकांकडून पैसे उकळल्याचं समोर आले आहे.

आरोपीला मिरजमधून अटक
आरोपीला मिरजमधून अटक करण्यात आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 6 अधिकाऱ्यांचे बनावट आदेश काढण्यात आलेले होते. गृहमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी विद्याधर महाले यांचा ईमेल आयडी हॅक करुन बदलीसंदर्भात सूचना दिल्या गेल्या. त्यानंतर आदेश काढण्यात आला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.