विद्यापीठाच्या रासेयोच्या चार विद्यार्थिंनींची प्रजासत्ताक दिन संचलन चाचणी शिबिरासाठी निवड

0

जळगाव;- आंध्र प्रदेशातील के.एल. विद्यापीठ, वदेश्वरम येथे १ ते १० नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या पश्चिम विभागीय पूर्व राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलन चाचणी निवड शिबीरासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रा.से.यो.च्या चार विद्यार्थिंनींची निवड झाली आहे.

विद्यापीठाच्या जैवशास्त्र प्रशाळेतील वैष्णवी पाटील, रसायनशास्त्र प्रशाळेतील गौरी पाटील, धुळे येथील झेङ. बी. पाटील महाविद्यालयाची कल्याणी क्षीरसागर, नंदुरबार येथील जी.टी.पी. महाविद्यालयाची विद्यार्थिनी गायत्री पाटील या चौघींची या शिबीरासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यातील ५६ रा.से.यो. स्वयंसेवक व तीन संघप्रमुख या शिबीरात सहभागी होतील. अशी माहिती रा.से.यो. चे संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.