अभिमानास्पद; स्क्वॉश मिक्स डबल्समध्ये सुवर्ण पदक, या दोन खेळाडूंनी रचला इतिहास

0

दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

स्क्वॉश मिक्स डबल्समध्ये दीपिका पल्लीकल आणि हरिंदर पाल संधू या दोघांनी सुवर्ण पदक मिळवले आहे. सुवर्ण आपल्या नवे करताच त्यांनी इतिहास रचला आहे. भारतीय स्क्वॉश जोडीने उत्तम कामगिरी करत मलेशियाचा २-० अशा फरकाने अंतिम सामन्यात पराभव केला, त्यामुळे आशियाई खेळामध्ये भारताने पदकांची लयलूट सुरूच ठेवल्याचं दिसून येत आहे.

या भारतीय जोडीने थरारक कामगिरी केली. ११-१० आणि ११-१० अशा चिवटीच्या लढतीत दीपिका पल्लीकल आणि हरिंदर पाल संधूने मलेशियाच्या अझमान, निंती आणि सैयाफिक बीन मोहोम्मद यांचा पराभव केला. भारताने सुवर्णपदकासह आशियाई खेळामध्ये आतापर्यंत २० सुवर्णपदक कमावले आहे.

दुसऱ्या सेटमध्ये भारतीय जोडीने आघाडी घेतली होती. भारतीय जोडीकडे सहा पॉईटची आघाडी होती. पण, त्यानंतर मलेशियाच्या संघाने चांगली कामगिरी करत १०-०९ असा सामना आणला. पण, दीपिका पल्लीकल आणि हरिंदर पाल संधूने आघाडी घेत पदक नावावर केले.

Leave A Reply

Your email address will not be published.