शिक्षक दिनी शिक्षकाच्या पत्नीचे मरणोत्तर नेत्रदान

0

देऊळगाव राजा (बुलढाणा), लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

शहरातील नगर परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक स्वर्गीय कृष्णराव  धोंडोपंत वैद्य यांच्या धर्मपत्नी सुमती बाई कृष्णराव वैद्य यांचे  5 सप्टेंबर रोजी वृध्दपकाळाने वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्यू पश्चात नातू केदार वैद्य याने आजीचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला.

शहरात मरणोत्तर नेत्रदान चळवळीमध्ये काम करणारे येथील जायंटस परिवाराचे डॉ. अशोक काबरा व सन्मती जैन यांना घटनेची माहिती दिली. यावरून त्यांनी गणपती नेत्रालय जालना येथे माहिती देऊन तेथील चमुस बोलावून घेतले.  यामध्ये डॉ. सम्राज्ञी मेहता व डॉ. नम्रता बनसोडे यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून नेत्रदान करून घेतले. कृत्रिम नेत्र त्या ठिकाणी बसवून दिले या शस्त्रक्रियेमुळे चेहऱ्यावर कोणताही परिणाम होत नाही तसेच नेत्रदान हे श्रेष्ठदान असल्याने ही चळवळ अधिक गतिमान झाल्यास भारतातील अंध व्यक्तीचे प्रमाण कमी होईल.

 

मृत्यूनंतर त्यांच्या परिवारातील सदस्यांनी नेत्रदान करण्याचा निर्णय घेऊन दोन अंध व्यक्तींना हे सुंदर जग पाहण्याची संधी उपलब्ध करून द्यावी असे यावेळी डॉ. सम्राज्ञी मेहता यांनी सांगितले. मृत्यु पश्चात त्यांच्या कुटुंबात एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.