देहूचं शिळा मंदिर सांस्कृतीक भविष्य घडणारी संस्था – पंतप्रधान मोदी

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी जवळपास ५० हजारांपेक्षा जास्त संख्येने वारकरी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.

देहूतील संत तुकाराम महाराजांचं शिळा मंदिर हे केवळ भक्ती-शक्तीचं केंद्र नव्हे तर सांस्कृतीक भविष्य घडवणारं मंदिर आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देहू इथं शिळा मंदिराचं उद्घाटनं पंतप्रधानांच्या हस्ते मंगळवारी पारं पडलं यावेळी ते बोलत होते.

यावेळी मोदी म्हणाले, आपल्या शास्त्रांमध्ये म्हटलंय की मनुष्य जन्म हा दुर्मिळ आहे. यामध्ये संतांचा सहवास लाभला की ईश्वराचं दर्शन आपोआप होतं. देहूच्या पवित्र भूमित आल्याचं मला सौभाग्य लाभलं त्यामुळं मी देखील याची अनुभूती घेतली आहे. काही महिन्यांपूर्वी मला पालखी मार्गावर दोन राष्ट्रीय मार्गांना चार लेन करण्याच्या शिलान्यासाची संधी मिळाली.

 

काही महिन्यांपूर्वीच मला पालखी मार्गावर दोन राष्ट्रीय मार्गांना चार लेन करण्याच्या भूमिपूजनाची संधी मिळाली होती. श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची सुरुवात पाच टप्प्यात होणार. संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचं काम ३ टप्प्यात पूर्ण होईल. या सर्व टप्प्यात ३५० किमीहून अधिक लांबीचे महामार्ग बनतील. यासाठी ११ हजार कोटींहून अधिक खर्च केला जाईल. या प्रयत्नांमुळं या भागातील विकासाला चालना मिळेल, असं मोदी यावेळी म्हणाले.

मोदी पुढे म्हणाले, आज सौभाग्यानं शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी मला देहूत येण्याचं सौभाग्य लाभलं. ज्या शिळेवर स्वतः तुकाराम महाराजांनी १३ दिवस तपस्या केली. जी शिळा तुकाराम महाराजांच्या वैराग्याची साक्षीदार होती. त्यामुळं ही केवळ शिळा नाही तर भक्ती आणि ज्ञानाचं आधारशिला आहे. देहूचं शिळा मंदिर केवळ भक्ती-शक्तीचं केंद्र नव्हे तर भारताच्या सांस्कृतीक भविष्याला देखील प्रशस्त करतं. या पवित्र स्थानाच्या पुननिर्माणासाठी मी मंदिर न्यास आणि सर्व भक्तांचं हृदयातून आभार व्यक्त करतो.

 

Leave A Reply

Your email address will not be published.