मृत्यूशी झुंज देणारी मी पाण्याची टाकी किती अंत पाहणार ही ग्रामपंचायत माझी ..

0

रजनीकांत पाटील, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अमळनेर, शिरुड 

अंत नको पाहू आता मृत्यूशी झुंज देणारे मी एक पाण्याची टाकी.  किती अंत पाहणार ही  ग्रामपंचायत माझी.  गावाच्या आत प्रवेश केला की सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळतात.  मी आजही 50 हजार लिटरचा भार डोक्यावर धरत मृत्यूशी झुंज देत तशीच उभी आहे.  माझ्या शरीराचे लहान मोठे लचके खाली जमिनीवर आजही पडतच आहे.

माझ्या आजूबाजूला वस्ती आहे व समोरून गावात जाण्याचा मुख्य रस्ता आहे. दोन्ही बाजूला देखील गल्ली बोळ्यात जाण्याचा मार्ग आहे.  जवळून जाणारे लोक माझ्याकडे वर मान करून  पाहतात. जेणेकरून मी खाली तर पडणार नाही, कोणाचा जीव तर घेणार नाही. अनावधानाने असे विघ्न घडू शकते. पण घडू नये.

मी माझ्या जीवाला सावरून कशीबशी एक पाय मरणाच्या दारात टाकून उभी आहे.  केव्हा माझा प्राण सुटेल ही एकच भीती..  माझा प्राण सुटल्याने कोणाचा जीव तर जाणार नाही ना या भीतीपोटी मी आजवर माझं आयुष्य काढत चालले आहे.  काय करणार किती दिवस मी थांबू.. मला या जागेवरून बाहेर काढा.  माझ्या अंतकरणातला आवाज कुणीतरी ऐका..  उगाच येणाऱ्या उद्याला माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर माझ्यामुळे कोणा गरीबाचा जीव जाईल.

50 हजार  लिटर पाण्याचा भार माझ्या डोक्यावर उभा असतो.  पाण्याचा एवढा मोठा भार मी सांभाळत आहे आणि मी आजही उभी असून गावाला पाणी पोहोचत आहे. रात्रभर माझ्यात हजारो लिटर पाणी साठवले जाते. जेवढे आहेत तेवढे मी हाताशी पकडून धरते पण बाकीचे पाणी मात्र माझ्या शरीराच्या  निष्क्रिय भागातून खाली गळून जाते.  एवढे दिसून देखील मात्र माझ्याकडे कोणीही पाहण्यास तयार नाही. मागील काही महिन्यांपूर्वी माझी हाक बाहेर आली असता अंतकरणातून मी विनंती केली. विनवण्या केल्या मात्र त्यावर कोणीही लक्ष देण्यास तयार नाही.

आजवर त्यापेक्षा अधिक बिकट परिस्थिती माझी झाली असून आज देखील माझ्याकडे लक्ष देण्यास कोणी तयार होत नाही. फक्त पाहतात आणि विचार करतात. उद्याला असे आश्वासन माझ्या कानी पडतात. असे आश्वासन किती दिवस ऐकवणार. अरे कोणीतरी माझी दखल घ्या माझी जाणीव ठेवा शेवटी मी एक पाण्याची टाकी टाकी आहे.  हजारोंचा भार माझ्या डोक्यावर आहे.  माझा नाही तर माझ्या खालून जाणाऱ्या लेकरा बाळांचा तरी विचार करा.

उद्या उठून कोणाचा तरी जीव जाईल याचा देखील भान ठेवा. बर्‍याचदा माझ्या शरीराचे लचके खाली पडले त्यातून बरीच जण कसेबसे वाचले अशा वेळेस लचके पडले त्या वेळेस खालून कोणी वापरले नाही.  म्हणून अनावधानाने बरेच अनर्थ मी टाळले. पण येणाऱ्या भविष्यकाळाचा विचार करा.  माझ्या जीवाची पर्वा नाही तर त्या गावातील नागरिकांच्या जीवाची परवा करा. उद्या उठून कोणीतरी कर्ता पुरुष माझ्या खाली दबला जाईल त्याचा संपूर्ण संसार अंधारात जाऊ शकतो, म्हणून माझी हात पाय जोडून डोकं टेकून कळकळीची विनंती आहे.. आता नका पाहू माझा अंत..

Leave A Reply

Your email address will not be published.