यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील नागरिकांना अल्प अशा वेळेत बोरावल टाकरखेडा मार्ग जळगाव जाण्यासाठी सोयीस्कर असलेला शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प या मार्गावरील नागरीकांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतुकीसाठीचा रस्ता जलसंपदा विभागाच्या आदेशाने आता बंद करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या शेळगाव बॅरेज या महत्वकांशी मध्यम प्रकल्पाचे काम जवळपास अंतिम पोहचले असुन, प्रकल्पाचे मुख्यकाम पुर्ण झाले असल्याने येणाऱ्या पावसाळ्यात नागरीकांसाठी बोरावल टाकरखेडा व शेळगाव मार्ग जळगावसाठी तयार करण्यात आलेल्या वाहतुकीसाठीचा कच्चा रस्ता काल दिनांक १३ जुनपासुन बंद करण्यात आला आहे.
या मार्गावरून पुर सदृ:श परिस्थितीमुळे प्रकल्पात साचणारे पाणी या मुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. नागरिकांना व वाहनधारकांनी कुठल्याही कारणास्तव तापी नदीच्या पात्रातुन जाण्याचा प्रयत्न करू नये व संभाव्य दुर्घटना टाळावी असे आवाहन जलसंपदा विभाग, शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प जळगावच्या वतीने करण्यात आले आहे.