विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पदवीसाठी विलंबशुल्कासह ऑनलाईन अर्ज करण्याची १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ३१ व्या दीक्षांत समारंभात पदवी मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी विलंबशुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत १५ नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे.

यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ संकेतस्थळ  www.nmu.ac.in  या वर Quick Links मध्ये Online Application for Degree Certificate  या Link  वर ऑनलाईन अर्ज व शुल्क भरावाचे आहे अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.दीपक दलाल यांनी दिली.

ऑक्टोबर २०२१ व एपिल / मे २०२२ मध्ये किंवा यापूर्वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला आहे, त्यांनाच ३१ व्या दीक्षांत समारंभात पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.