जिंकाल तर पुढे जाल, नाहीतर घरी परताल; विश्वचषकात भारताची झाली ही अवस्था…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

ऑस्ट्रेलियात (Australia) खेळल्या जाणाऱ्या ICCT20 विश्वचषक (ICCT20 World Cup) स्पर्धेत कमालीची चुरस बघायला मिळत आहे. एकवेळ जवळजवळ स्पर्धेच्या बाहेर फेकल्या गेलेल्या पाकिस्तान संघाने आफ्रिकेचा पराभव करत स्पर्धेत आपले स्थान अजूनही कायम ठेवलेय. त्यामुळे भारताला आता पुढचा सामना हलक्यात घेता येणार नाहीये. विश्वचषकात 4 सामने खेळून टीम इंडियाचे सध्या 6 गुण आहेत आणि भारताचा पुढील सामना रविवारी झिम्बाब्वेशी आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताकडे दोन मार्ग आहेत, एक झिम्बाब्वेला हरवल्यास भारताचे 8 गुण होतील पण जर पाऊस पडला आणि सामना रद्द झाला तर भारताला अजूनही संधी आहे कारण त्यांचे 7 गुण असतील. दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्सवर मात केल्यास ते 7 गुणांसह उपांत्य फेरीतही पोहोचतील. आता पाकिस्तानचे ४ सामने खेळून ४ गुण झाले असून त्यांना पुढील सामना बांगलादेशशी खेळायचा आहे.

पाकिस्तानला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. त्याचबरोबर झिम्बाब्वेने भारताचा पराभव करावा, अशी प्रार्थनाही त्याला करावी लागणार आहे. अशा स्थितीत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचे 6 गुण असतील आणि चांगल्या धावगतीमुळे पाकिस्तानी संघ उपांत्य फेरीत जाऊ शकतो पण त्यासाठी त्यांना बांगलादेशचा पराभव करावा लागेल.

दुसरीकडे, दुसऱ्या गटात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा 4 धावांनी पराभव केला असून त्यांचे न्यूझीलंडप्रमाणे 7 गुण आहेत पण इंग्लंडचा अजून एक सामना बाकी आहे. इंग्लंडला कोणत्याही किंमतीत श्रीलंकेला हरवावे लागेल, तिथे पाऊस पडला आणि गुण विभागले तर ते बाद होतील. जर इंग्लंडने श्रीलंकेला पराभूत केले तर चांगल्या धावगतीच्या आधारावर ते उपांत्य फेरीत पोहोचतील कारण त्यांचा धावगती ऑस्ट्रेलियापेक्षा चांगला आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंडसाठी आता ‘करा किंवा मरो’ अशी परिस्थिती निर्माण झाली असून विजयाशिवाय पर्याय उरला नाही. तुम्ही जिंकलात तर पुढे जाल, नाहीतर घरी परताल.

Leave A Reply

Your email address will not be published.