शेतात तूर आणि मक्याच्या आड पिकवला गांजा…

0

 

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

तालुक्यातील खडके सिम येथे एरंडोल-कासोदा रस्त्यालगत अंजनी धरणाच्या जलसाठा परीसरात सुमारे १० एकर क्षेत्रात आजूबाजूला तूर आणि मका मात्र मध्यभागी गांजाची (Marijuana) शेती असल्याचे निष्पन्न झाल्याचे उघडकीस आले आहे.

एरंडोल शहरापासून सुमारे ७ किलोमीटर अंतरावर राज्य महामार्गालगत ही गांजाची शेती आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. असा प्रकार कित्येक वर्षांपासून सूरू होता. याबाबत जनमानसात उलटसुलट चर्चा होत आहे. रहदारी महामार्गालगत गांजाची शेती होत असल्याची माहीती पुढे आल्याने नागरीकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान गूरूवारी रात्री या शेतात पोलिस गस्तीवर होते.

खडके सीम येथे नितीश डिगंबर पाटील व सिध्दार्थ डिगंबर पाटील या दोन्ही भावांची सामायीक शेतजमीन असून ती शेती पावरा आदीवासी करीत होता. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हे त्यांच्या सहकाऱ्यांसह शेतावर पोहोचल्यामुळे चौकशी होत असतांना पावरा आपल्या परीवारासह पलायन करण्यात यशस्वी झालेला असून शुक्रवारी सकाळी ७ वाजेपासून शेतावरील गांजाच्या पिकाचा पंचनामा सूरू करण्यात आला.

गांजाच्या झाडांची प्रत्येकी उंची ही ३ ते ४ फूट आहे, अशी माहीती सूत्रांनी दिली. सदर क्षेत्रातील गांजा हा २ क्विंटलपेक्षा अधिक असावा असा प्राथमिक अंदाज आहे. पंचनामा प्रसंगी तहसिलदार सुचिता चव्हाण, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, स.पो.नी गणेश अहीरे, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, राजेश पाटील,मिलींद कुमावत, अनिल पाटील, जुबेर खाटीक, संदीप पाटील, संतोष चौधरी हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.