जळगावच्या व्ही.जी मिसेस इंडिया दीपा तोलानी (व्हिडीओ)

0

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मी मिळवलेला हा व्ही.जी मिसेस इंडिया या पुरस्कारासाठी वरिष्ठ स्तरावर मोठी स्पर्धा होती. मनात धाकधुकही होती. कि काय होईल ? पण मी एक जळगावकर आहे आणि जळगावकरांमध्ये सर्व करण्याची क्षमता आहे असे म्हटले जाते. त्यामुळे कठोर परिश्रम करणे आणि वेळेचे नियोजन हाच विषय डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न सुरूच ठेवले त्यातून यश मिळत गेले अशी माहिती आज झालेल्या पत्रपरिषदेत व्ही.जी.मिसेस इंडिया खिताब पटकाविलेल्या दीपा तोलानी यांनी दिली.

फेसबुक वरून बिनिता श्रीवास्तव यांच्याशी संपर्क झाला.त्यातून त्यांनी या स्पर्धेची माहिती दिली. त्यांना मी भेटली त्यांनी मला काही बदल करायला सांगितले त्यानुसार मी रोज सकाळी व्यायाम, फिटनेस कडे प्रथम लक्ष दिले. यातून माझे १० किलो वजन कमी झाले. यानंतर ६ ते ९ जुलै दरम्यान दिल्ली येथे हि स्पर्धा संपन्न झाली. यात संपूर्ण राज्यभरातून ऑनलाईन पद्धतीने हजारो महिलांच्या स्पर्धेतून २० महिला निवडल्या गेल्या. यात महाराष्ट्रातून मी एक होती. म्हणूनच मला मिसेस महाराष्ट्र पुरस्काराच्या मानकरी हा खिताबही मिळाला. यासाठी मला तुमचा रोल मांडेल कोण या ?,तुम्ही तुमच्या मुलांना काय शिकावं देऊ इच्छिता ? आणि तुम्हाला एक दिवस भारताचे प्रधानमंत्री बनवलं तर तुम्ही काय करणार ? असे प्रश्नही विचारले गेले. त्याची मी अतिशय चांगली उत्तरे दिल्याने ५० वयाच्या वर असलेल्या मला व्ही.जी.मिसेस इंडिया हा खिताब मिळाला.

यासाठी घरातून मला खूपच मदत झाली. माझे पती, मूल आणि संपूर्ण कुटुंबाने मला वेळोवेळी पाठबळ दिले. यातून सतत पुढे जाण्यासाठी मला वाट मिळत गेली. यासाठी द फिटनेस कोड या जिम ट्रेनिंग सेंटर मधील निनाद चौधरी व चारुदत्त नन्नवरे यांनी माझ्याकडून कठोर मेहनत करवून घेत योग्य त्या सल्ल्याने  आज मी या जागी पोहोचली आहे. हा मान मला एकटीला जरी भेटला असला तरी यात सर्व जळगावकरांचे आशीर्वाद आहेच असेही दीप तोलानींनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.