इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त आज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी रेडक्रॉसची स्थापनेपासून ते अजतायागत रेडक्रॉस करीत असलेल्या सेवाकार्याची माहिती सादर केली व रेडक्रॉसच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त रेडक्रॉसने दिनांक १३ जुलै रोजी आयोजीत केलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.

डॉ. रितेश पाटील – रेडक्रॉस व सेवारथ परिवार, जळगाव तर्फे रेडक्रॉस दवाखान्याचे उद्घाटन दिनांक १३ जुलै रोजी रेडक्रॉसचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांचे शुभहस्ते होणार आहे. याची माहिती देवून या दवाखान्यामार्फत विविध रुग्णसेवेची अत्यल्प दरात सेवा देण्याची माहिती दिली. यात तपासणी फी रु.२०/-, तपासणी अधिक इंजेक्शन रु.४०/- वाफ देणे – रु.२०/-, ड्रेसिंग करणे रु.३०/-, ई.सी.जी. तपासणी रु.80/- रक्तातील शुगर तपासणी एक वेळेची रु.४०/-, सलाईन (लहान सलाईन सह)रु.७०/-, सलाईन (मोठी सलाईन सह) रु.१००/- सलाईन (मोठी सलाईन सह) रु.१५०/- असे दर निर्धारित केलेले आहे अशी माहिती दिली.

 

विनोद बियाणी – चेअरमन रेडक्रॉस यांनी दिनांक १३ जुलै, २०२२ रोजी डॉ. विद्या गायकवाड यांचे शुभहस्ते खोटेनगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला आहे. याची माहिती देवून रेडक्रॉस करीत असलेल्या सेवकार्याची माहिती दिली. डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी – चेअरमन – रेडक्रॉस रक्तकेंद्र यांनी गुणवत्ता युक्त अशी रक्त घटक रुग्णाना रक्तकेंद्रामार्फत दिली जाते.

 

NAT टेस्ट रक्त चाचणी प्रणालीचा अवलंब करून जगातील अति सुरक्षित रक्तघटक १०० टक्के देण्याचा संकल्प केलेला आहे, त्या करीता गरीब व गरजू रूग्णांना प्रत्येक NAT टेस्टेड रक्तघटकास रकम रु.३००/= ची सवलत योजने मार्फत पुरवली जाते.

 

 

रेडक्रॉस हि एक आंतराष्ट्रीय सेवाभावी संस्था असून मानवी मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी या संस्थेची स्थापना सर हेनरी ड्यूनांट यांनी केली. आजमितीस संपूर्ण जगभरात रेडक्रॉस अविरतपणे सेवाभावी कार्य करीत आहे. 187 देशांमध्ये 7,00,000 स्वयंसेवकांच्या माध्यमातून अखंडितपणे निस्पृह भावनेने काम करणारी सर्वात मोठी संस्था आहे. “मानवता, नि:पक्षपातीपणा, तटस्थता, स्वातंत्र्य, स्वयंसेवा, एकता, विश्वव्यापकता,” या मुलतत्वांवर आधारित रेडक्रॉस संस्थेचे कार्य लक्षात घेता जगातील 187 देशांमध्ये संस्थेची स्थापना करण्यात आली. माणसाच्या व निसर्गाच्या आक्रमणापासून प्रत्येक जीवाचे संरक्षण करणे हाच प्रमुख धर्म आहे, ही शिकवण संपूर्ण जगाला देण्याचे काम रेडक्रॉस करीत आहे व भविष्यात हि करत राहील.

 

 

आंतराष्ट्रीय रेडक्रॉसचे मुख्यालय जिनिव्हा(स्विझर्लंड) येथे आहे. इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे दिल्ली येथे मुख्य कार्यालय असून राष्ट्रीय पातळीवर भारताचे महामहीम राष्ट्रपती, राज्य पातळीवर महाराष्टाचे राज्यपाल आणि जिल्हा पातळीवर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पदसिध्द अध्यक्ष असतात.

 

भारतात दिल्ली येथे सन 1920 साली रेडक्रॉसची स्थापना झाली. हळूहळू भारतातील प्रत्येक राज्यात आणि जिल्ह्यात रेडक्रॉसच्या शाखा स्थापन झाल्या. सर्वच स्तरावर रेडक्रॉसच्या सामाजिक कार्याची प्रगती होत गेली आणि आता जवळजवळ भारताच्या प्रत्येक जिल्ह्यात रेडक्रॉस तळागाळापर्यंत सेवा देत आहे. अनेकविध मानवतावादी व सेवाभावी उपक्रम या रेडक्रॉस शाखांच्या माध्यमातून राबविण्यात येतात.

 

मानवीन मूल्यांचे जतन व पीडितांची सेवा या मूळ उद्देश्याने इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जळगाव जिल्ह्याच्या शाखेची स्थापना 13 जुलै 1953 रोजी करण्यात आली. जनसेवेचा ध्यास व राष्ट्रीय सेवाकार्याची प्रेरणा घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेल्या या सेवाकार्याला आज 69 वर्ष पूर्ण झाली असून संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील सेवाभावी नागरिकांच्या सहकार्याने या सेवारथाची घोडदौड यशस्वीरीत्या आजही सरू आहे.

 

24 तास सेवेत रक्तकेंद्र, थॅलेसीमिया अमृत योजना-थॅलेसीमिया रुग्णांना विनामुल्य रक्तपुरवठा, रेडक्रॉस संचलित पाटील धर्मार्थ दवाखाना, रेडक्रॉस संचलित केदारनाथ जेनरिक मेडिकल स्टोअर्स, रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, ज्युनियर व युथ रेडक्रॉस, प्रथमोपचार प्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, ई सेतु व आधार सुविधा केंद्र, रेडक्रॉस ऑर्थोपेडीक लायब्ररी, रेडक्रॉस ऑक्सिजन बँक, विद्यालयातून प्लास्टिक संकलन केंद्र, कॅन्सर संजीवन मार्गदर्शन केंद्र, पर्यावरण -वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन इत्यादी उपक्रम कायमस्वरूपी यशस्वीरीत्या सुरु असून या व्यतिरिक्त आवश्यकतेनुसार नागरिकांच्या सेवेसाठी अनेक तपासणी शिबिरे हि घेतली जातात.

 

वर्षभरातील विविध जागतिक दिनाचे औचित्य साधून समाज उपयोगी उपक्रम हाती घेतले जातात. जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष यांच्या मार्गदर्शना नुसार संपूर्ण कोरोना काळात हि रेडक्रॉसने मानवतावादी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन अनेक प्रकारे जिल्ह्याला सेवा दिली.

 

रेडक्रॉस, जळगाव वर्धापन दिनानिमित्त दिनांक – १३ जुलै, २०२२ रोजी विविध सेवाभावी उपक्रम राबविले जाणार आहे – त्यातील प्रामुख्याने खालील उपक्रम आहेत –

१. रेडक्रॉस, जळगाव वर्धापन दिनानिमित्त – इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा, जळगाव संचलित रेडक्रॉस दवाखाना सौजन्य – सेवारथ परिवार, जळगाव मार्फत अल्पदरात तपासणी, उपचार व औषधी इत्यादी उद्घाटन – शुभहस्ते – रेडक्रॉस अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (भा.प्र,से.) – दिनांक – १३ जुलै, २०२२ रोजी संध्याकाळी ठीक ६ वाजता

ठिकाण – ओम शांती नगर, बाजार रोड, आदर्श हॉटेलच्या मागे, डॉ. रितेश पाटील यांच्या शेजारी, पिंप्राळा, जळगाव संपर्क क्रमांक – ८८०५८१२९६५, ७२७६३८६३७८.

 

२. रेडक्रॉस जळगाव वर्धापन दिनानिमित्त – इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा शाखा, जळगाव तर्फे वृक्षा रोपण पर्यावरण संवर्धन कार्यक्रम – शुभ हस्ते – डॉ. विद्या गायकवाड – आयुक्त – महानगरपालिका, जळगाव दिनांक – १३ जुलै, २०२२ रोजी सकाळी ठीक – १० वाजता ठिकाण – खोटे नगर परिसर, जळगाव

 

३. रेडक्रॉस जळगाव वर्धापन दिनानिमित्त – इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा, जळगाव तर्फे रेडक्रॉस रक्तकेंद्र, जळगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक – १३ जुलै, २०२२ रोजी वेळ सकाळी – ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.