दहावी, बारावीच्या परीक्षेत होम सेंटर बंद करण्याचा निर्णय

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोनाच्या फैलावामुळे राज्यात 2021 मध्ये दहावी, बारावी परीक्षा झाली नव्हती. त्यासाठी अंतर्गत मूल्यमापन गुणदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुढे 2022 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम होता. त्यामुळे विशेष निर्णय घेऊन परीक्षा घेण्यात आल्या होत्या. ज्यात शाळा तेथे केंद्र  25 टक्के कमी अभ्यासक्रम, याशिवाय उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी अर्धा तास अधिकचा वेळ देण्यात आला होता. मात्र यावेळी होम सेंटर रद्द करण्यात आले आहे, 100 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे,

तसेच अधिकचा वेळ देखील मिळणार नाही. फेब्रुवारी (February) आणि मार्च (March) महिन्यात होणाऱ्या दहावी, बारावी परीक्षेसाठी (परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व अन्य पूर्ण तयारी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे. तर यावेळी दहावी, बारावीच्या परीक्षेत होम सेंटर (Home Center) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.