जळगावात आजाराला कंटाळून युवकाने घेतला गळफास

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीत राहणाऱ्या २१ वर्षीय तरूणाने आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ९ सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रिरेश उर्फ श्याम दिनेश पाटील (वय-२१) रा. सुप्रिम कॉलनी, असे मयत युवकाचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि प्रिरेश पाटील हा आपल्या आई-वडील आणि दोन भावांसोबत सुप्रिम कॉलनीत राहात होता . तो एका खासगी कंपनीत नोकरीला होता. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांला पाठीचा त्रास त्याला जाणवत होता. औषधोपचार करूनही त्याच्या आजारात काहीच फरक पडत नसल्याने सोमवारी ९ जानेवारी रोजी सायंकाळीघरात कोणीच नसताना प्रिरेश याने आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. सायंकाळी ६.३० वाजता प्रिरेशची आई वंदना पाटील ह्या घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला. शेजारच्यांनी त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे. त्याच्या पश्चात आई वंदना, वडील दिनेश मधुकर, जुळा भाऊ श्रीरेश आणि मोठा भाऊ भागवत असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.