Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»कुसुंबा येथे हवालदारासह एकाला तिघांकडून बेदम मारहाण
    गुन्हे वार्ता

    कुसुंबा येथे हवालदारासह एकाला तिघांकडून बेदम मारहाण

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 10, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    जेवणासाठी गेलेल्या एका पोलीस हवालदाराशी एकाला तीन जणांनी क्षुल्लक कारणांनी मारहाण केल्याची घटना कुसुंबा येथे एका हॉटेलमधे घडली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे यातील एकाला एमआयडीसी पोलिसांनी आज सकाळी ताब्यात घेतले असून इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहे.

    सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, मिर्झा मोहम्मद इसराल हिमायू बेग (वय-३८) रा. जामनेर, जि.जळगाव हे सोयगाव पोलीस ठाण्यात पोलीस हवलदार म्हणून नोकरीवर आहेत. सोमवारी ९ जानेवारी रोजी मिर्झा बेग हे त्यांचे मित्र सलीम शेख रा. जामनेर यांच्यासोबत दुचाकीने जळगावला खासगी कामासाठी आलेअसता काम आटोपून पुन्हा दुचाकीने मित्रासोबत जामनेला जाण्यासाठी निघाले. जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील रॉकेश हॉटेल येथे सायंकाळी ५.३० वाजता जेवण करण्यासाठी थांबले. त्यावेळी हॉटेलात तीन जणांनी त्यांचा मित्र सलीम शेख याला काहीही कारण नसतांना मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी मिर्झा बेग हे गेले असता त्यांना देखील तिघांनी मारहाण केली. पोलीसांना मिळालेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तिघांची नावे निष्पन्न झाली.

    यात संशयित आरोपी आकाश विश्वे रा. सुप्रिम कॉलनी, सुनिल सुभाष साळवे रा. पाळासखेडा ता. सोयगाव जि.औरंगाबाद आणि सुनिल सोनार (पुर्ण नाव माहिती नाही) या तिघांविरोधात सोमवारी उशिरा एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. यातील संशयित आरोपी सुनिल सुभाष साळवे याला मंगळवारी १० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता अटक करण्यात आली .

    #crime #hanamari #jalgaon #MIDCpolice
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण

    July 19, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif