रणजी ट्रॉफीत पृथ्वी शॉने झळकावले तडाखेबंद शतक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

रणजी ट्रॉफीत भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने पुन्हा एकदा तडाखेबंद फलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या आणि श्रीलंकेविरूद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत संधी न मिळाल्याने त्याने नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आज त्याने शतकी खेळी करून निवड समितीला इशारा दिला आहे. सध्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आणि आसाम यांच्यात सामना खेळवला जात आहे.

दरम्यान, आसामच्या संघाने नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण . पृथ्वी शॉ आणि मुशीर खान या सलामीवारांनी शानदार सुरूवात करून आसामवर दबाव टाकण्यात यश मिळविले असता मुशीर खान त्याच्या अर्धशतकाला मुकलेणे तो 42 धावांवर तंबूत परतला. पण पृथ्वी 107 चेंडूत 100 धावा करून अद्याप खेळपट्टीवर टिकून आहे.

पहिल्या दिवसातील पहिल्या सत्रापर्यंत मुंबईची धावसंख्या 36 षटकांत 1 बाद 171 एवढी झाली आहे. मुख्तार हुसैन वगळता आसामच्या कोणत्याच गोलंदाजाला यश मिळाले नाही. पृथ्वीने आपल्या शतकी खेळीत 1 षटकार आणि 15 चौकार मारले. खरं तर मुंबईचा संघ मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात रणजी ट्रॉफीच्या रिंगणात उतरला आहे. तर, आजपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील वन डे मालिकेला सुरूवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथे पार पडणार आहे. या मालिकेतील संघातील वरिष्ठ खेळाडू आगामी वन डे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर संघात पुनरागमन करत आहेत. कारण अलीकडेच पार पडलेल्या ट्वेंटी-20 मालिकेत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांना विश्रांती देण्यात आली होती. ट्वेंटी-20 संघात पृथ्वी शॉला संधी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र, तसे झाले नसले तरी त्याने शतक केल्याने निवड समितीला आपल्याकडे लक्ष वाढण्यास भाग पडले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.