दावोस परिषदेसाठी ३४ कोटींची तरतूद – मुख्यमंत्री

0

मुंबई : मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यासाठी राज्य औद्योगिक विकास महामंडळाने ३४ कोटींची तरतूद केल्याची माहिती, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा यांनी दिली.

प्रोटोकॉलनुसार खर्चाचे नियोजन पूर्ण झाल्याचे ते म्हणाले. दरम्यान, दावोसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यात १ लाख ४० हजार कोटींचे गुंतवणूक करार करणार असल्याचे समजते. दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्र सरकारही सहभागी होत आहे. गेल्या वर्षी या परिषदेतून राज्य सरकारने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक राज्यात आणल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

१९ जानेवारीदरम्यान होत असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने येथील जागेचे आरक्षण, दालन, आर्थिक परिषदेसाठी सहभागी होणाऱ्या शिष्टमंडळातील सदस्यांचा व्हिसा, विमान प्रवास खर्च, स्थानिक प्रवास खर्च, राहण्याची व्यवस्था, सुरक्षेकरिता मिळून १८ कोटी रुपयांची तरतूद केली ली आहे. परिषदेसाठी सजावट आणि दालनाच्या उभारणीसाठी सुमारे १६ कोटी रुपये अशा एकूण ३४ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. खर्चाच्या विवरणाचे पूर्ण नियोजन झाल्याची माहिती, शर्मा यांनी दिली.

गेल्या वर्षी दावोस येथे सरकारच्या वतीने स्टेट डिनर दिले होते. या डिनरसाठी १०० व्यक्ती आमंत्रित असताना १५० व्यक्ती हजर झाल्या. सुमारे पन्नास लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च यावेळी झाला होता. मुख्यमंत्र्यांच्या प्रवासासाठी १६ कोटी ३० लाख रुपये, स्टेट डिनरसाठी ७ कोटी २७ लाख, भेटवस्तूंसाठी २ कोटी, सुरक्षेसाठी ६ लाख रुपये, स्थानिक वृत्तपत्रांमधील प्रसिद्धीसाठी १ कोटी ६२ लाख, आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीसाठी २ कोटी, चार्टर विमानाच्या अतिरिक्त खचर्चासाठी १ कोटी ८९ लाख असा एकूण ३२ कोटी ३१ लाख रुपये खर्च झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.