तुम्ही १० वी पास आहात ? मग करा पोस्ट खात्यात नोकरीसाठी अर्ज !

0

मुंबई ;– भारतीय पोस्ट ही जगातील सर्वात मोठी टपाल प्रणाली आहे. ही प्रणाली सुरळीत चालावी यासाठी विभागाला हजारो कुशल कर्मचाऱ्यांची गरज भासते. त्यासाठी वेळोवेळी कर्मचारी भरती केली जाते.आताही भारतीय पोस्टल सर्कलनं ग्रामीण डाक सेवक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. शाखा पोस्टमास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM) आणि डाक सेवकांच्या पदांसाठी ही कर्मचारी भरती केली जाणार आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवार indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची आणि फी जमा करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट आहे. अर्जदार 24 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत त्यांच्या अर्जामध्ये बदल करू शकतील. या मेगा भरती मोहिमेद्वारे एकूण 30 हजार 041 रिक्त जागा भरण्याचं उद्दिष्ट आहे.शैक्षणिक पात्रता: अर्जदारांनी भारत सरकार/राज्य सरकारं/केंद्रशासित प्रदेशांनी मान्यता दिलेल्या कोणत्याही शिक्षण मंडळाच्या विद्यालयातून गणित आणि इंग्रजी विषयांसह इयत्ता 10 उत्तीर्ण केलेली असावी. शिवाय, जीडीएस पदासाठी कोणत्याही मंजूर श्रेणींमध्ये अर्ज करणाऱ्यांनी त्यांच्या स्थानिक भाषेचा किमान माध्यमिक स्तरापर्यंत (अनिवार्य किंवा ऐच्छिक विषय म्हणून) अभ्यास केलेला असावा.जीडीएस वेतन आणि भत्ता: शाखा पोस्टमास्तर (BPM) पदावर ग्रामीण डाक सेवक (GDS) म्हणून नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांना 12 हजार रुपये ते 29,380 रुपयांपर्यंत वेतन मिळेल. डाक सेवक आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM) म्हणून काम करणाऱ्यांना 10 हजार रुपये ते 24 हजार 470 रुपये वेतन मिळेल.अर्ज कसा करावा?स्टेप 1: indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.स्टेप 2: ‘Apply Online’ या पर्यायावर क्लिक करा.स्टेप 3: अर्जात नमूद केलेले आवश्यक तपशील भरा.स्टेप 4: मार्गदर्शक तत्त्वांनुसार कागदपत्रं, फोटो आणि सहीच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.स्टेप 5: लागू असल्यास अर्ज फी भरा आणि सबमिट बटण दाबा.स्टेप 6: पुढील वापरासाठी अर्जाची प्रिंटआउट काढून घ्या.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.