मुंबईच्या बड्या उद्योगपतीने केला अभिनेत्रीवर अत्याचार ; गुन्हा दाखल

0

मुंबई ;- लग्नाचे आमिष दाखवून मुंबईत एका अभिनेत्रीवर बड्या उद्योगपतीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उद्योगपतीने लग्नाचं आमिष दाखवून पीडित अभिनेत्रीचं लैंगिक शोषण केलं आहे. याप्रकरणी एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी उद्योगपतीने पीडितेला लग्नाचं आमिष दिलं होतं. त्यानंतर त्याने तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केला आहे.

याप्रकरणी पीडित अभिनेत्रीने एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमांतर्गत आरोपी उद्योगपतीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून आपल्यावर अनेकदा अत्याचार केला, असा आरोपी पीडितेनं तक्रारीत केला आहे.याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.