श्रीकृष्ण मंडळाने फोडली मानाची दहीहंडी

0

जळगाव : शहरात ठिकठिकाणी दहिहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुभाष चौकातील मानाची दहीहंडी फोडण्यासाठी शहरातील पाच गोविंदा पथक आले होते. या पथकाने पाच थरांपर्यंत सलामी दिली, मात्र पहिल्या सलामीपासून जुने जळगावातील श्रीकृष्ण मित्र मंडळाने सहा थर लावून सलामी देत अवघ्या दुसऱ्या प्रयत्नात दहीहंडी फोडण्याचा मान गणेश जाधव या चिमुकल्या गोविंदाने पटकाविला.

हंडी फोडण्यापूर्वीच विजेते घोषीत जुने जळगावातील श्रीकृष्ण तरुण मंडळाने पहिल्याच प्रयत्नात सहा मानवी मनोरे लावून ४० फुटावर सलामी दिली. त्यानंतर इतर मंडळांना सहा  थरापर्यंत मनोरे लावता आली नाही. दुसऱ्या प्रयत्नात देखील त्यांनी सहा थर लावल्यामुळे त्यांना विजेते घोषीत करण्यात आले. त्यानंतर याच मंडळाने ९.१० मिनिटांनी तिसऱ्यांदा सहा थर लावून चिमुकल्या गणेश जाधव या गोविंदाने हंडीला लटकून मानाची दहीहंडी फोडण्याचा मान पटकाविला.

शहरातील सुभाष चौक बहुद्देशीय मित्र मंडळातर्फे मानाच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचे यंदा ६० वे वर्ष होते. यावेळी आ. राजूमामा भोळे, माजी उपमहापौर सुनिल खडके,मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत खटोड यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.