चीनमध्ये भरलाय मुर्खांचा बाजार!

0

बीजिंग : या ना त्या कारणाने सातत्याने चर्चेत राहणाऱ्या चीन या देशात सध्या चक्क ‘मूर्खाचा बाजार’ भरला आहे. कारण, या देशात महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांचा मेंदू ऑनलाइन विकला जात आहे. आइनस्टाईन यांचा बुद्ध्यांक (आयक्यू) सर्वात जास्त होता. त्यामुळे हा मेंदू विकत घेणारी व्यक्तीदेखील आइनस्टाईन यांच्यासारखीच बुद्धिवान होऊ शकेल, असा दावा केला जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चीनमधील लोक या असल्या भाकडकथेवर विश्वास ठेवत आहेत.

प्रत्यक्षात हा काही आइनस्टाईनचा मेंदू वगैरे नाही. तर ते ‘ब्रेन पॉवर’ अर्थात मेंदूची क्षमता वाढवणारे एक प्रॉडक्ट आहे. या प्रॉडक्टचे ब्रँडिंग आइनस्टाईनच्या मेंदूच्या नावाने केले जात आहे. या तथाकथित ब्रेन पॉवर वाढवणाऱ्या उत्पादनाची सध्या चीनमध्येधुमधडाक्यात ऑनलाइन विक्री केली जात आहे.

विक्रेते असा दावा करत आहेत की, जर थोडेसे पैसे खर्च कराल तर तुमचा मेंदू आइनस्टाईनसारखा सुपरफास्ट बनेल. ‘ ताओबाओ’ नामक ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवर सध्या हे व्हर्च्यूअल प्रॉडक्ट विकले जात आहे. हे व्हर्च्यूअल प्रॉडक्ट विकत घेतल्यानंतर तुम्हाला एका रात्रीत असा फरक दिसून येईल की, तुम्हाला वाटेल की, तुमच्या मेंदूची क्षमता कित्येक पटीने वाढली आहे.

हास्यास्पद बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल वीस हजारांहून अधिक लोक या कंपनीच्या भूलथापांना बळी पडले असून त्यांनी हे प्रॉडक्ट विकत घेतले आहे. या प्रॉडक्टवर आइनस्टाईन यांचा फोटोदेखील लावण्याचा अगोचरपणा संबंधित कंपनीने केला आहे, ही संतापजनक बाब आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.