दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना जाहीर…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत अमिट छाप सोडणारी अभिनेत्री वहिदा रेहमानची चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार दादासाहेब फाळकेसाठी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. वहिदा रहमान यांना यावर्षी ‘दादा साहेब फाळके जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वहिदा रहमान ही हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहे. black and White सिनेमापासून ते रंगीत सिनेमा पर्यंतच्या चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहे.

वहिदा रहमान यांनी आपल्या अभिनयाने दीर्घकाळ सिनेसृष्टीवर राज्य केले आहे. देव आनंद, राज कपूर, राजकुमार, मनोज कुमार आणि सुनील दत्त यांच्यासह हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक बड्या कलाकारांसोबत त्यांनी पडद्यावर काम केले. वहिदा रहमान यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1938 रोजी चेन्नई येथे झाला आणि 1955 मध्ये त्यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर 1956 मध्ये CID या चित्रपटातून त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत पहिला ब्रेक मिळाला. या चित्रपटात वहिदा रहमानने नकारात्मक भूमिका साकारली असली तरी तिची भूमिका खूप आवडली होती. यावेळी चाहत्यांना वहिदा आणि गुरु दत्त यांची जोडी खूप आवडली. प्यासा, कागज के फूल, चौधरी का चांद, साहिब बीवी आणि गुलाम यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने त्यांच्यासोबत काम केले.

वहिदा रहमान यांना 1965 मध्ये गाईड या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. वहिदा रहमानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी 1974 मध्ये अभिनेता शशी रेखी यांच्याशी लग्न केले. पण 2000 मध्ये त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. यानंतर वहिदा रहमानने पुन्हा एकदा काम करण्यास सुरुवात केली आणि दिल्ली 6, रंग दे बसंती आणि पाणी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. वहिदा रहमानने २०२१ साली प्रदर्शित झालेल्या स्केटर गर्ल या मराठी चित्रपटात शेवटचे काम केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.