कौतुकास्पद : केसुर्डी गावातील शालेय विद्यार्थिनींना ३० सायकली भेट

0

ग्रामपंचायतीच्या सायकल बँकेचा उपक्रम ठरला आदर्श

लोकशाही न्यूज नेटवर्क

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव (ता. खंडाळा) या गावानजिक असलेल्या केसुर्डी ग्रामपंचायतीने शिक्षणासाठी दररोज ५ ते ६ किमी पायपीट करणाऱ्या ३० शाळकरी विद्यार्थिनींना सायंकाळी देऊन एक आदर्श निर्माण केल्याने जिल्ह्यात या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

केसुर्डी गावातील मुलींना व मुलांना शिक्षणासाठी दररोज किमान 5 ते 6 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागायचा. मुलांची होणारी गैरसोय केसुर्डी गावचे सरपंच गणेश ढमाळ यांनीविद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर व्हावेत आणि शाळे पर्यंतचा प्रवास सुरक्षित आणि सुकर व्हावा यासाठी ग्रामपंचायतीने सायकल बँक हा उपक्रम सुरू केला. या शाळकरी मुलींना पुरविण्यात आलेल्या सायकली, त्यांचे या ठिकाणचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांच्याकडे राहणार असून त्यानंतर गावातून नायगाव अथवा इतरत्र जाणाऱ्या मुलींकडे ही सायकल हस्तांतरीत होईल.काहींचे शिक्षण झाल्यानंतर ती सायकल एखाद्या गरजवंत विद्यार्थ्यांकडे देण्यात येईल असा या सायकल बँकच उद्देश असल्याचे सरपंच ढमाळ यांनी सांगितले.

यावेळी उपसरपंच आकाश खडसरे, सदस्या सुरेखा ढमाळ यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक किरण शिंदे, मुख्याध्यापक रमेश यादव, नायगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री. कोकरे, दादासाहेब ढमाळ, माजी उपसरपंच आनंद ढमाळ, गिरजोबा शेंडगे, नवनाथ ढमाळ, निलेश कोळपे, दशरथ जाधव, अनिकेत येलगुडे, शरद ढमाळ, उत्तम ढमाळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.