बँक खाते व्हेरिफिकेशनच्या नावाने तरुणाला गंडवले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. बँकेतून बोलत असल्याचे सांगून बँकेचे खाते व्हेरिफिकेशनच्या नावाने जळगावातील आसोदा रोड भागातील तरूणाला १० हजार १५४ रुपयात ऑनलाईन गंडवले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील आसोदा रोड भागातील रहिवासी विशाल विनोद कोळी (वय २३) हा बेंडाळे कॉम्प्लेक्समधील श्री ऑनलाईन सर्व्हिस शॉप या दुकानावर असतांना त्याला अनोळखी क्रमांकावरून फोन आला. आयडीएफसी बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांनी विशालला सिव्हिल व्हेरिफिकेशन अँपची बतावणी केली.

त्याद्वारे अनोळखींनी विशालच्या बँक खात्याची माहिती घेत एका लींकद्वारे त्याच्या क्रेडिट कार्डमधून ऑनलाईन १० हजार १५४ रुपये काढुन घेतले. २८ जानेवारी रोजी घडलेली घटना शनिवार १२ फेब्रुवारी रोजी विशालच्या लक्षात आल्याने त्याने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून फोनवर बोलणाऱ्या अनोळखी संजीव शर्मा नामक व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक रूस्तम तडवी हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.