सीमकार्ड KYC च्या नावाखाली ७४ हजारात ऑनलाईन फसवणूक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील गणपती नगरमध्ये राहणाऱ्या एकाला मोबाईल सीमकार्ड केवायसीच्या नावाखाली ७४ हजार रूपयांची ऑनलाईन गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यशोधन अरूण व्यवहारे (वय ४६, रा. गणपती नगर जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. खासगी नोकरी करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. गुरूवार २७ जानेवारी रेाजी सायंकाळी ५ वाजता ते घरी असतांना त्यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मोबाईल सिमकार्ड केवायसीच्या नावाखाली कागदपत्रांची पुर्तता करण्याचे सांगून कस्टमर केअरला संपर्क साधण्याचे सांगितले.

त्यानुसार यशोधन व्यवहारे यांनी लागलीत दिलेल्या नंबरवर संपर्क साधला असता अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर १० रूपयाचे रिचार्ज करण्याचे सांगितले. यासाठी एक ॲप डाऊनलोड करण्याचे सांगितले. व्यवहारे यांनी ॲप डाऊनलोड केले व १० रूपयाचे रिचार्ज केला. रिचार्ज केल्याने त्यांच्या बँक खात्यातून १० रूपये कापले गेले. काही वेळानंतर त्यांच्या खात्यातून पाच वेळा पैसे कापले गेल्याचे मॅसेजेस आले. त्याची बँक डिटेल तपासले असता व्यवहारे यांच्या बँकखात्यातून एकुण ७४ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे दिसून आले.

दरम्यान त्यांनी तात्काळ रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक विजय खैरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.