भातखंडे येथे सैन्य दलातील जवानांच्या भारतीय रक्षक ग्रुपच्या कोनशिलेचे अनावरण

0

भातखंडे, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील अनेक तरुण सैन्य दलात देश सेवेसाठी गेले आहेत. काही निवृत्त झालेले आहेत तर काही देश सेवा करीत आहेत. गावातील जवानांची नावं आपल्या गावाच्या फलकावर लागली पाहिजे अशी मनीषा गावातील काही तरुणांना वाटली आणि त्यांनी तो मनोदय व्यक्त केला होता. आपल्या गावातील जे जवान सैन्यदलात सेवेत आहेत किंवा निवृत्त झालेले आहेत त्यांची नावे गाव फलकावर लावावे यासाठी सैन्य दलात सेवेत असलेले जवानांचे नाव एकत्र गोळा करून त्याची भव्य मोठी अशी कोनशिला तयार करून त्या कोणशिलेवर या सर्व आजी-माजी आर्मीतील, सीआरपीएफ मधील, पोलीस दलातील जवानांची नावे एकत्रितपणे करण्यासाठी गावातील तरुण वर्ग यांनी सहकार्य केले.

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर भारतीय रक्षक ग्रुपच्या भव्य अशा कोनशिलेचे अनावरण गावातील सेवानिवृत्त जवान शरद हिंमत पाटील, सेवा देणारे जवान संदीप लोटन पाटील, विकास अनिल पाटील, बाबूलाल महाजन यांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात आले.

यावेळी गावाचा प्रथम नागरिक सरपंच भागाबाई भील्ल, उपसरपंच अनिल दयाराम पाटील, सदस्य अतुल शांताराम महाजन, संदीप पाटील, नितीन पाटील, रोहिदास मधुकर चौधरी, गुरुदास भालेराव, राहुल पुंडलीक पाटील, नितीन पुंडलीक पाटील, ग्रामसेवक चंद्रकांत अशोक सोमवंशी, ग्रामपंचायतीचे कर्मचारी संदीप पाटील, रमेश दगडू बागुल, तुषार कांतीलाल पाटील, योगेश रघुनाथ पाटील, मराठी शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख रावसाहेब पाटील, भातखंडे माध्यमिक शाळेचे जेष्ठ शिक्षक तथा पत्रकार बी एन पाटील, मराठी शाळेचे देसले सर, शिनकर सर, मालोजी पवार, तलाठी सुनील मांडोळे, चावरे सर तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर अहोरात्र सेवा करणाऱ्या गावातील जवानांची नावे ग्रामपंचायतीच्या फलकावर, गावाच्या मुख्यप्रवेशद्वारा समोर आल्याने ही गावासाठी तरुणांसाठी व सैन्य दलातील सेवेत व निवृत्त जवानांसाठी खूप अभिमानाची व गर्वाची गोष्ट आहे. ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी व तरुण वर्गाने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.