आधार कार्ड नाही म्हणून विद्यार्थ्यांना मारहाण; शिक्षिकेवर गुन्हा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

चंद्रपूर

वरोरा : येथील आधार कार्ड आणले नाही म्हणून इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना शिक्षिकेने लाकडी पट्टीने हात सुजेपर्यंत मारहाण केल्याचा प्रकार वरोरा शहरानजीकच्या एका शाळेत शुक्रवारी घडला आहे.

मारहाण केल्याने विद्यार्थ्यांच्या काही बोटांची हालचाल बंद झाली असून, या प्रकरणी शिक्षिकेविरुद्ध पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

सेन्टे ॲन्स हायस्कूल वरोरामधील इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिकेने आधार कार्ड आणण्यास सांगितले होते. त्यात दोन विद्यार्थ्यांनी आधार कार्ड आणले नाही.

त्यामुळे वर्गशिक्षिका राखी गिरडकर-काळबांडे यांनी दोघांना लाकडी स्केलने हातावर मारहाण केली. या दोन्ही विद्यार्थ्यांच्या हातावर सूज आली असून काही बोटांची हालचाल बंद झाली आहे.

संबंधित शिक्षिका शनिवारी रजेवर होत्या. तिच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. त्यांच्याशी बोलल्यानंतर काही सांगता येईल.

– डॉली वर्गीस, मुख्याध्यापिका,

सेंट ॲन्स हायस्कूल, वरोरा बोर्डा

पालकांची तक्रार प्राप्त झाली. वैद्यकीय अहवाल प्रतीक्षेत आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करू.

– नीलेश चावरे,

सहायक पोलीस निरीक्षक, वरोरा

Leave A Reply

Your email address will not be published.