शिरुड जि.प.शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिरूड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरुड येथे सर्व विद्यार्थ्यांच्या निरामय आरोग्यासाठी डॉ. मोनिका भदाणे, डेंटल सर्जन, पूणे यांच्या मार्गदर्शनाखाली 4 मार्च शुक्रवारी सकाळी 8 वा मोफत दंत तपासणी व उपचार आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. लोकसहभागातून सर्व विद्यार्थ्यांना टूथपेस्ट व टूथब्रश देण्यात आला.

याप्रसंगी नुतन उपसरपंच कल्याणी प्रफूल्ल पाटील यांचा सत्कार मुख्याध्यापक रत्ना भदाणे यांनी केला. विविध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य कल्पेश माळी, भाऊसाहेब पाटील, विनायक पाटील, यशवंत बैसाणे व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सैनाज खाटीक (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, शिरुड) सरपंच व उपसरपंच, सर्व सन्माननीय सदस्य, ग्रामपंचायत शिरूड, डॉ. अतूल चौधरी वैद्यकीय अधिकारी शिरूड, डॉ.गणेश पाटील, शालेय आरोग्य तपासणी प्रमुख अमळनेर अनिता पाटील, सिस्टर व सर्व आशा ताई यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.