Monday, August 15, 2022

जावयाने केला सासऱ्याचा खून; हातात चाकू घेऊन थेट पोलिसात

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

पुणे : कौटुंबिक वादातून जावयाने साऱ्याचा चाकूने वार करत खून केला आहे. रमेश उत्तरकर असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आरोपी अशोक कुडले हा त्यांचा जावई असून या घटनेनंतर आरोपी अशोक कुडले स्वतः हातात चाकू घेत खडकी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला. आणि खून केल्याची कबुली दिली.

- Advertisement -

- Advertisement -

अशोक कुडले रमेश उत्तरकर यांचा जावई आहे.  2019 पासून अशोक आणि त्याच्या पत्नीत वाद होते. त्यामुळे ते दोघे वेगळे राहायचा अस. त्याची पत्नीही गेल्या तीन वर्षापासून वडिलांकडे राहायला आहे. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत.

दरम्यान या दोन कुटुंबातील वाद हा न्यायप्रविष्ट आहे. अशोक कुडले हा आपल्या पत्नीला नांदायला परत पाठवा अशी मागणी सतत आपल्या सासर्‍याकडे करत होता. तर उत्तरकर हे घटस्पोट देण्याबाबत ठाम होते. याप्रकरणी काल न्यायालयात तारीख होती. या दरम्यानच या दोघांमध्ये काल दुपारी वाद झाला.

हाच वादाचा राग डोक्यात ठेवून संध्याकाळी अशोक हा उत्तरकर यांच्या दुकानात गेला. उत्तरकर हे सायंकाळी दुकानात बसले असताना अशोकने त्यांच्यावर  चाकूने जोरदार वार केले. त्यानंतर उत्तरकर यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेनंतर अशोक कुडले स्वतः हातात चाकू घेत खडकी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला. आणि खून केल्याची कबुली देखील दिली.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या