जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव येथील रामेश्वर कॉलनीतील तरूणाला दोन भावांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश राजेंद्र चौधरी (वय २२, रा. रामेश्वर कॉलनी) हा तरूण आपल्या कुटूंबासह राहतो. योगेश चौधरीने सहा महिन्यापूर्वी मनोज सुरेश पाटील व लखन सुरेश पाटील (रा. रामेश्वर कॉलनी) यांच्या दुकानात चोरी केली होती. याचा राग मनात ठेवून १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता संशयित आरोपी मनोज सुरेश पाटील व लखन सुरेश पाटील या दोन्ही भावांनी लोखंडाच्या दांडयाने मारहाण केली.
त्यानंतर पाठ, खाद्यांवर तसेच डोक्यावर विट मारून दुखापत केली. तरूणाला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी योगेश चौधरी याने मंगळवारी १८ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून मनोज पाटील व लखन पाटील या दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.