Monday, August 15, 2022

तरूणाचा महागडा मोबाईल रिक्षातून लांबविला

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जळगाव ; तरूणाचा महागडा मोबाईल रिक्षातून लांबविला.शहरातील नेरी नाका परिसरातील स्मशानभूमीजवळून एकाचा रिक्षाचा महागडा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

राकेश सुकदेव शेळके (वय-२४) रा. चिंचोली ता. जि. जळगाव हा तरूण शुक्रवार ८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जळगावातील नेरीनाका स्मशानभूमीजवळ रिक्षात बसलेला होता. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या २० हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. त्यांनी रिक्षासह परिसरात शोधा केली मोबाईल कोठेही आढळला नाही.

याप्रकरणी शनिवारी ९ एप्रिल रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मनोज इंद्रेकर करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या