खळबळजनक..म्हशीला पाणी देण्यासाठी गेलेल्या महिलेचा धारदार शस्त्राने खून

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

पुणे 

वडगाव मावळ :आंदरमावळातील तळपेवाडी माळेगाव बुद्रुक येथे  शेतातील पेरणीचे काम करून म्हशीला पाणी देण्यासाठी गोठ्यामध्ये गेलेल्या महिलेवर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने डोक्यावर मानेवार वार करून खून केल्याची खळबळजनक घटना  घडली आहे . फासाबाई साळू निसाळ (वय ३६) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या बाबत साळू मारूती निसाळ याने फिर्याद दिली आहे.

वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे पती आणि पत्नी यांनी टाटा कंपनीच्या मालकीच्या क्षेत्रातून सामुहिक शेतीमंध्ये पेरणीचे काम करतात.

आज  म्हशीला पाणी देण्यासाठी ते शेतातील गोठ्यामध्ये गेल्यावर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने तोंडावर, गळ्यावर, डोक्यावर, हातावर वार करून खून केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय वडोदे करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.