नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगाव तर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगावतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी महापौर जयश्री महाजन, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रोटरी वेस्टचे वीरेंद्र छाजेड, रोटरियन पूजा अग्रवाल, आशा मौर्य, सेवाधर्म संस्था अध्यक्ष चंद्रशेखर नेवे, नारीशक्ती बहुद्देशीय संस्थाअध्यक्ष मनिषा पाटील उपास्थित होते.

यावेळी कठीण परिस्थितीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यात एड्स वर कार्य करणाऱ्या डॉ. नीलिमा सेठिया, दिव्यांग सविता साळुंखे, निस्वार्थ वृत्तीने मोफत योगवर्ग घेणाऱ्या महानंदा पाटील, नेहा जगताप, आशा निंबाळकर, बेबीताई चांदेलकर, मीना कोळी, सुश्मिता भालेराव, रेखा महाजन, ज्योती घोडके, आशा जगताप, सुरेखा जंजाळकर यासंह भगिनींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यात पिंक रिक्षा चालक, पेट्रोल पंपवर काम करणाऱ्या, धुणे भांडी करून आपल्या मुलाला डॉक्टर बनविणाऱ्या महिलांचा समावेश होता. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले पती, वडील व कुटुंबाला दिले तर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी मनोगतात म्हटले की, माझ्या यशस्वी कार्यात माझ्या आईचा माझ्या पत्नीचा मोलाचा वाटा आहे. कारण आईने कठिण परिस्थितीत संगोपन करून शिकविले व पत्नी माझ्या मुलांना मला व घराला सांभाळते म्हणून मी चांगल्या प्रकारे काम करू शकतो. काही भगिनींना कष्टाचे मोल पहिल्यांदाच मिळालेल्या या पुरस्काराच्या स्वरूपात मिळाल्याने आनंदाश्रू आवरत नव्हते.

यावेळी नारीशक्ती बहुद्देशीय संस्था सदस्य नूतन तासखेडकर, किमया पाटील, भारती कापडणे, रेणुका हींगु, माधुरी शिंपी यांचे अनमोल सहकार्य लाभले. तसेच चंद्रशेखर नेवे व आशा मौर्य यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचलन ज्योती राणे यांनी केले व आभार ॲड. सीमा जाधव यांनी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.