नोकरीत कायम करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ

0

एरंडोल :-येथील माहेर असलेल्या विवाहितेला नोकरीवर कायम करण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की केवडीपुरा येथील माहेर असलेल्या दीक्षा शुभम सोनवणे वय 19 यांचा विवाह शुभम चंद्रकांत सोनवणे राहणार ठाणे यांच्याशी रितीरिवाज्यानुसार झाला होता. मात्र विवाह नंतर 29 डिसेंबर 2022 ते १२ एप्रिल 2023 च्या दरम्यान दीक्षा सोनवणे यांना तुझ्या माहेरहून नोकरीवर परमनंट करण्यासाठी पैसे आणावेत यासाठी वेळोवेळी तगादा लावून पैसे न आणल्यास तुला नांदवणार नाही ,घरात घुसू देणार नाही, आणि तुला फारकत देऊन टाकू असे सांगून शारीरिक व मानसिक छळ करून त्यांनी मारहाण करीत धमकी दिली. या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पती शुभम चंद्रकांत सोनवणे, वर्षा चंद्रकांत सोनवणे, सुजल चंद्रकांत सोनवणे, धनश्री रोशन खरे, पद्माबाई एकनाथ डव सर्व राहणार आणि हनुमान मंदिराजवळ भवानीनगर वागळे इस्टेट ठाणे यांच्याविरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस कॉन्स्टेबल विलास पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.