वाघोड येथे 18 वर्षीय तरुणाने घेतला गळफास

0

रावेर;- तालुक्यातील वाघोडे येथील 18 वर्षे तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रावेर तालुक्यातील वाघोड येथील रहिवासी धीरज ईश्वर मशाने व 18 याने राहत्या घराच्या पुढील पत्र्याच्या छताच्या खोलीत आडव्या लाकडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मयत घोषित केले .याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अर्जुन सोनवणे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.